Ad will apear here
Next
आज संग्रहालय दिन : घरबसल्या पाहा जगभरातील उत्तमोत्तम संग्रहालये
मुंबईतील भाऊ दाजी लाड संग्रहालयाचा आभासी 'फील'

१८ मे हा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. पर्यटनासाठी कुठे गेलं, की हमखास बघितली जातात ती तिथली संग्रहालयं. यंदा मात्र करोनामुळे जगभरातील नागरिकांच्या फिरण्यावरच मर्यादा आल्या आहेत; मात्र तरीही घरबसल्या आपल्याला संग्रहालये पाहणे शक्य आहे. ‘गुगल आर्टस् अँड कल्चर’ या प्रकल्पाद्वारे गुगलने जगातल्या अनेक महत्त्वाची संग्रहालये, कला, संस्कृतीची वैशिष्ट्ये ऑनलाइन उपलब्ध केली आहेत. ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, स्ट्रीट व्ह्यू, ३६० अंशांतील छायाचित्रण अशा तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण या सगळ्याचा अगदी प्रत्यक्ष भेटीसारखा अनुभव घेऊ शकतो. त्याविषयी...
.........
जागतिक पातळीवरील विविध काळातील कला, संस्कृती आणि सामाजिक अवकाश टिपून आणि जपून ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी अनेक संग्रहालयांनी केली आहे. पर्यटनासाठी कुठे गेलं की हमखास बघितली जातात ती तिथली संग्रहालयं. वेगवेगळ्या वस्तू, जगात नावाजली गेलेली चित्रं, छायाचित्रं, मूर्ती, इतिहासाच्या पाऊलखुणा असलेले पुरातन अवशेष आणि बरंच काही दाखवणाऱ्या या संग्रहालयांना भेट दिली जाते. संग्रहालयांचे महत्त्व लक्षात घेऊनच दर वर्षी १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला जातो. ‘समानता, विविधता आणि सर्वसमावेशकतेसाठी संग्रहालये’ अशी २०२०च्या संग्रहालय दिनाची संकल्पना आहे.

लिओनार्दो दा व्हिन्सीने आपला जीव ओतून रेखाटलेले मोनालिसाचे जगप्रसिद्ध चित्र समोरून बघणं, इजिप्तमधल्या एखाद्या राजाच्या ‘ममी’च्या पेटीशेजारी उभं राहून शाळेतील इतिहासाच्या पुस्तकातील ‘ममी’ची छबी आणि प्रत्यक्ष ममी यांची मनातल्या मनात तुलना करणं, व्हॅन गॉगने कॅनव्हासवर केलेली रंगांची उधळण डोळ्यांत साठवणं या सगळ्या गोष्टी खरं तर याचि देही याचि डोळा अनुभवाव्या अशाच आहेत; पण कलेची आवड असलेल्या प्रत्येकालाच हे परवडेल किंवा प्रत्यक्ष जाऊन बघणे शक्य होईल असे नाही. शिवाय सध्या करोनामुळे लागू असलेल्या निर्बंधामुळे आणखी काही काळ तरी पर्यटनाला कुठे जाणे शक्य होईल असे वाटत नाही.



पण सगळ्या कलाप्रेमींना गुगलने जागतिक अवकाशच खुलं केलं आहे. गुगलमध्ये एखाद्या ‘पेंटिंग’चं नाव टाकलं की ते बघता येतं, हे सर्वांनाच माहिती आहे; पण कोणत्या संग्रहालयात कोणतं चित्र आहे किंवा आपल्या आवडीनुसार जगातल्या ऐतिहासिक संग्रहालयांची व्हर्च्युअल सफर करायची असेल तर? ही कल्पना अशक्य नाही; नव्हे, ती प्रत्यक्षातच आली आहे. गुगलच्या ‘गुगल आर्टस् अँड कल्चर’ या वेबसाइटवरून तुम्ही आहात तिथून तुमच्या हातातील मोबाइल, टॅब, लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून जगातील शेकडो संग्रहालयांची सैर करू शकता.

मोठमोठ्या कलादालनांमध्ये, संग्रहालयांमध्ये घरबसल्या फिरण्याचा, आवडेल ते चित्र, वस्तू जवळून बघण्याचा अनुभव या ‘गुगल आर्टस् अँड कल्चर’ या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना घरसबल्या घेता येतो. यामध्ये संग्रहालयांमधील कलाप्रकारांची उच्च प्रतीची छायाचित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. फक्त इतकेच नाही, तर आपण त्या कलादालनांमध्ये प्रत्यक्ष फिरतोय, चालतोय असा अनुभव देण्यासाठी ‘३६० डिग्री’ छायाचित्रण आणि ‘स्ट्रीट व्ह्यू’ तंत्रज्ञानाचा वापर करून ही आभासी संग्रहालये तयार करण्यात आली आहेत. 



गुगलने २०११ साली ‘गुगल आर्ट प्रोजेक्ट’ या नावाने या प्रकल्पाची सुरुवात केली. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७ संग्रहालयांनी या प्रकल्पासाठी आपल्या संग्रहालयातली छायाचित्रं दिली. त्यानंतर २०१२मध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून ४० देशांतील एकूण १५१ संग्रहालयांचा खजिना सामान्यांसाठी खुला करण्यात आला. आजच्या घडीला जगभरातील दोन हजारांहून अधिक संग्रहालये, आर्ट गॅलरीज आणि अन्य सांस्कृतिक संस्था गुगलच्या या प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्या आहेत.

यावर कलाप्रकार, कलाकाराचं नाव, संग्रहालय, संग्रहालयाचं शहर, कालावधी यानुसार विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे तशा प्रकारे सर्च करून हव्या असलेल्या छायाचित्रापर्यंत किंवा कलाकृतीपर्यंत पोहोचता येऊ शकतं. त्यासाठी गुगलने आद्याक्षरानुसार याद्या दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कलाप्रकाराच्या उपप्रकारांत जाऊन ते पाहता येतात. तेथे असलेल्या कलाकृती झूम करूनही व्यवस्थित पाहता येतात. प्रत्येक कलाकृतीची, कलाकाराची, संबंधित संस्थेची, म्युझियमची सविस्तर माहिती, इतिहास वगैरे गोष्टीही तिथे देण्यात आल्या आहेत. 

यावर लॉगिन करून कलाप्रेमींना घरबसल्या जगातील वेगवेगळ्या संग्रहालयातील आपल्याला आवडलेल्या चित्रांचे, कलाकृतींचे एक वैयक्तिक आभासी संग्रहालय तयार करता येऊ शकते. ते त्यांना सोशल मीडियावर शेअरही करता येऊ शकते. त्यामुळे फावल्या वेळात आणि सध्याच्या लॉकडाउनच्या काळात घरबसल्या जगातील संग्रहालयांची सैर करणं ही गोष्ट अजिबातच अवघड नाही. येत्या काळात जगातील आणखी काही संग्रहालये या प्रकल्पात सहभाग होणार आहेत. 

भारतातीलही अनेक आर्ट गॅलरी, संग्रहालये या प्रकल्पात सहभागी झाली आहेत. राजा रविवर्मांसारख्या भारतीय चित्रकारांची चित्रेही येथे पाहता येतात. तसेच, जगभरातील कलाकार आणि कलाविषयक संस्था, आर्ट गॅलरीज आदींना या प्रकल्पात सहभागी व्हायचे असेल तर त्याची माहितीही या साइटवर दिलेली आहे. 

‘आर्टस् अँड कल्चर’ची मोबाइल अॅप्सही आता उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी वगैरे तंत्रांच्या साह्याने आपल्या घरातही संग्रहालयाचा आभास तयार करता येतो. थोडक्यात म्हणजे जगभरातल्या कला, संस्कृतीचा आस्वाद आपल्याला अगदी घरबसल्या घेता येतो. मनोरंजन तर होतेच; पण ज्ञानातही खूप मोठी भर पडते. त्यामुळे या प्रकल्पाला जरूर भेट द्या....

गुगल आर्टस् अँड कल्चरची वेबसाइट : https://artsandculture.google.com/

गुगलचे अॅक्टिव्हिटी बुक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

.........
हेही जरूर वाचा...

जगातील महत्त्वाची संग्रहालये : https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5094557371829181385

भारतातील लोकप्रिय संग्रहालये : https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4910852520520930597

महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये : https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4630266588177741446
 
पुण्यातील सायकलींचे संग्रहालय : https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5324258324919443778
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZRPCM
Similar Posts
भारतीय वस्त्र परंपरा - शेफाली वैद्य यांचे व्याख्यान (व्हिडिओ) भारतीय वस्त्रपरंपरेला काही हजार वर्षांची परंपरा आहे. अलीकडेच झालेल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरूनही हे स्पष्ट झाले आहे, की कापूस लागवड करून त्यापासून वस्त्र तयार करण्याची कला भारतीयांना किमान साडेतीन हजार वर्षांपूर्वीपासून अवगत होती. नवरात्रीनिमित्ताने राष्ट्रीय युवक विचार मंचाने आयोजित केलेल्या
दशावतार आणि यक्षगान दशावतार आणि यक्षगान या दोन्हीही लोककला आहेत; मात्र कर्नाटकातील यक्षगान ही कला जोपासण्यासाठी, बहरण्यासाठी जितके अभ्यासपूर्ण प्रयत्न झाले, तितके महाराष्ट्रातील दशावताराच्या बाबतीत फारसे झालेले नाहीत. या दोन्ही कलांच्या गुणवैशिष्ट्यांचा आढावा घेणारा आणि दशावताराच्या भविष्याबद्दल चिंतन करणारा हा ‘रंगवाचा’मधील लेख
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language